अमरावती : नाराजांमुळे उमेदवारांना क्रॉस व्होटिंगची धास्ती
अमरावती, 09 जानेवारी (हिं.स.) | महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी केवळ पाच दिवस उरले आहेत. मात्र, काँग्रेस, भाजपसह बहुतांश सर्वच राजकीय पक्षांतील नाराज कार्यकर्ते अद्यापही प्रचारात पाहिजे तसे उतरलेले नाही. उमेदवारी नाकारलेल्या काही नाराजांनी निवडक
नाराजांमुळे उमेदवारांना क्रॉस व्होटिंगची धास्ती  'आपला माणूस' चालविण्याची घातली जात आहे गळ


अमरावती, 09 जानेवारी (हिं.स.) | महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी केवळ पाच दिवस उरले आहेत. मात्र, काँग्रेस, भाजपसह बहुतांश सर्वच राजकीय पक्षांतील नाराज कार्यकर्ते अद्यापही प्रचारात पाहिजे तसे उतरलेले नाही. उमेदवारी नाकारलेल्या काही नाराजांनी निवडक कार्यकर्ते बरोबर घेऊन काही प्रभागांमध्ये क्रॉस व्होटिंगसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे काही उमेदवारांनी क्रॉस व्होटिंगची धास्ती घेतली आहे.

दुसरीकडे स्थानिक नेत्यांनी क्रॉस व्होटिंग टाळण्यासाठी दक्षता घेण्यास सुरुवात केली आहे. अमरावती महापालिकेची निवडणूक २०१७ मध्ये झाली होती. त्यांनंतर महापालिकेतर साडेतीन वर्षे प्रशासक राज होते. पालिकेच्या 22 प्रभागांतील 87 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात राजकीय कार्यकर्ते इच्छुक होते, तर अनेक माजी नगरसेवकांनी प्रभागातील इतर सक्षम कार्यकर्त्यांना सोबत घेऊन निवडणुकीची तयारी केली होती. पण, काँग्रेस, भाजपसह अन्य काही राजकीय पक्षांनी काही माजी नगरसेवकांसह अनेक इच्छुकांना उमेदवारी दिली नाही. त्यामुळे या निवडणुकीत नाराजांची संख्या मोठ्चा प्रमाणात आहे. याचा फटका राजकीय पक्षांच्या उमेदवारांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, १५ जानेवारीला निवडणुकीनंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande