
नंदुरबार, 9 जानेवारी, (हिं.स.) - नवापूर तालुक्यातील अवैध गौणखनिज उत्खनन आणि वाहतूक करताना जप्त करण्यात आलेले वाहन क्रमांक GJ-16-W-0086 चा लिलाव 15 जानेवारी 2026 रोजी दुपारी 12.00 वाजता तहसील कार्यालय, नवापूर येथे होणार असल्याची माहिती तहसिलदार दत्तात्रय जाधव यांनी आहे.
वाहन मालकाला दंडात्मक नोटीस व आदेश देण्यात आले होते, परंतु त्यांनी अद्यापपर्यंत दंडाची रक्कम भरलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या तरतुदींनुसार सदर वाहनावर जमीन महसुलाची थकबाकी समजून हा लिलाव करण्यात येत आहे . सर्व इच्छुक नागरिकांनी या लिलावासाठी तहसील कार्यालय, नवापूर येथे उपस्थित राहावे, असेही आवाहन तहसीलदार श्री. जाधव यांनी केले आहे .
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर