चिनी बेदाण्यावर निर्बंध घालण्याची मागणी
सोलापूर, 09 जानेवारी (हिं.स.)। चीनमधील निकृष्ट दर्जाचा बेदाणा राज्यात विक्री होत असल्याचे समोर आल्याने उत्पादक धास्तावले आहेत. त्यामुळे चिनी बेदाणा विक्री करणाऱ्या अडत व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करावेत. संबंधित कोल्ड स्टोअरेज चौकशी होईपर्यंत सील क
चिनी बेदाण्यावर निर्बंध घालण्याची मागणी


सोलापूर, 09 जानेवारी (हिं.स.)। चीनमधील निकृष्ट दर्जाचा बेदाणा राज्यात विक्री होत असल्याचे समोर आल्याने उत्पादक धास्तावले आहेत. त्यामुळे चिनी बेदाणा विक्री करणाऱ्या अडत व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करावेत. संबंधित कोल्ड स्टोअरेज चौकशी होईपर्यंत सील करावे. त्यांच्यावर आठ दिवसात कठोर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा बेदाणा उत्पादक शेतकरी आंदोलन करणार असल्याची मागणी करकंब येथील शेतकऱ्यांनी बाजार समितीचे सभापती यांच्याकडे केली.मागील दोन वर्षे प्रतिकूल स्थितीमुळे भारतात द्राक्ष उत्पादन कमी होत आहे. यंदाही कमी प्रमाणात द्राक्षे येणार आहेत. त्यामुळे बेदाणा उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे. उत्पादन घटल्यामुळे बेदाण्याचे दर वाढले आहेत. वाढीव दराचा फायदा घेण्यासाठी अफगाणिस्तानातून चीनचा निकृष्ट बेदाणा छुप्या पध्दतीने भारतात आयात करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande