
लातूर, 09 जानेवारी (हिं.स.)। महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या प्रभाग क्रमांक ६ व १६ मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभेस माजी आमदार धिरज देशमुख यांनी उपस्थित राहून मतदारांशी संवाद साधला.
या वेळी बोलताना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा मुख्य अजेंडा हा सर्वसमावेशक आणि लोकाभिमुख विकास हाच आहे.लातूर शहरातील पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज व्यवस्था, स्वच्छता,आरोग्य सुविधा, शिक्षण,महिला व युवकांसाठी संधी निर्माण करणे यावर आमचा विशेष भर आहे.
काँग्रेस पक्ष हा नेहमीच विकासासोबत लोकशाही आणि संविधानिक मूल्ये जपणारा पक्ष राहीला आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत लातूर शहराचा समतोल व शाश्वत विकास घडवून आणणे हे आमचे ध्येय आहे.
लातूरच्या जनतेने नेहमीच विकासाभिमुख आणि पुरोगामी विचारांना साथ दिली आहे त्यामुळे येत्या १५ जानेवारी रोजी होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत लातूरकरांनी काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करून विकास, पारदर्शकता आणि जनतेच्या हितासाठी आपला कौल द्यावा, असे आवाहन धिरज देशमुख यांनी यावेळी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis