धुळे मनपा निवडणुकीसाठी 15 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर
नंदुरबार, 9 जानेवारी, (हिं.स.) | शासनाचे उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने धुळे जिल्ह्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानासाठी गुरुवार 15 जानेवारी 20256 रोजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदार संघात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. असे सरक
धुळे मनपा निवडणुकीसाठी 15 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर


नंदुरबार, 9 जानेवारी, (हिं.स.) | शासनाचे उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने धुळे जिल्ह्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानासाठी गुरुवार 15 जानेवारी 20256 रोजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदार संघात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. असे सरकारी कामगार अधिकारी मधुरा सूर्यवंशी यांनी कळविले आहे.

सुट्टीची व्याप्ती: ही सुट्टी निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेल्या सर्व कामगार, अधिकारी आणि कर्मचारी यांना लागू असेल, जरी ते कामासाठी जिल्ह्याबाहेर कार्यरत असले तरीही लागू असलेले आस्थापने: ही सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने, खाजगी कंपन्या, निवासी हॉटेल्स, खाद्यगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम, माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर्स, मॉल्स, रिटेलर्स इत्यादींना बंधनकारक आहे .

अपवादात्मक परिस्थिती: अत्यावश्यक किंवा निरंतर सेवा पुरवणाऱ्या आस्थापनांमध्ये, जिथे पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल, तिथे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना किमान दोन ते तीन तासांची सवलत देणे आवश्यक आहे . मात्र, यासाठी संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेणे अनिवार्य आहे.

कारवाईची तरतूद: आस्थापना मालकांनी या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. मतदारांना सुट्टी किंवा सवलत न मिळाल्यामुळे मतदान करता न आल्याची तक्रार आल्यास, संबंधित मालकांविरुद्ध योग्य ती कारवाई केली जाईल.

तक्रार नोंदवता येईल: कामगार/मतदारांनी तक्रार असल्यास आपली तक्रार सरकारी कामगार अधिकारी यांचे कार्यालय, प्लॉट नं. 231, तळमजला,मीरा हॉस्पिटल, स्टेशन रोड, धुळे दूरध्वनी क्रमांक 02562-283340 येथे नोंदवता येईल. सर्व उद्योजक आणि आस्थापना मालकांना त्यांच्याकडील मतदार कामगारांना/अधिकाऱ्यांना मतदानासाठी सुट्टी किंवा सवलत द्यावी, असे आवाहनही सरकार कामगार अधिकारी धुळे/नंदुरबार सूर्यवंशी यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande