
अमरावती, 09 जानेवारी (हिं.स.) । महानगरपालिकानिवडणुकी च्या अनुषंगाने मतदान प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक व सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक ती सर्व तयारी करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने झोन क्र.१ ते ७ येथे स्थापन करण्यात आलेल्या सुरक्षा कक्षामध्ये आज सकाळी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (ईव्.एम.) मधील बॅलेट युनिट (बीयू) व कंट्रोल युनिट (सीयू) यांची सिलींग प्रक्रिया अधिकृतरित्या सुरू करण्यात आली, या महत्वपूर्ण प्रसंगी डॉ. भरत एन. बस्तेवाड, आयुक्त, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा), नागपूर तथा मुख्य निवडणूक निरीक्षक व अनिल खंडागळे अप्पर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निरीक्षक यांनी सुरक्षा कक्षास भेट देऊन प्रत्यक्ष सिलींग प्रक्रियेची पाहणी केली. त्यांनी ईव्हीएम सिलींग प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित व नियमानुसार होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच उपस्थित अधिकाऱ्यांना निवडणूक प्रक्रिया कोणत्याही त्रुटीशिवाय पार पाडण्यासाठी दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या. सहभागी व्हावे, असे आवाहन नागरिकांनी निर्भयपणे मतदान प्रक्रियेत प्रशासनाच्या वतीने यावेळी करण्यात आले आहे. ---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी