जळगाव - निवडणुकीदरम्यान मद्यविक्री दुकाने बंद ठेवण्याबाबत आदेश जारी
जळगाव, 09 जानेवारी (हिं.स.) जळगाव शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ करीता निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला असून राज्य निवडणूक आयोगाने जळगाव महानगरपालिका हद्दीच्या कार्यक्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू केलेली आहे. या निवडणुकीसाठी १५ जा
जळगाव - निवडणुकीदरम्यान मद्यविक्री दुकाने बंद ठेवण्याबाबत आदेश जारी


जळगाव, 09 जानेवारी (हिं.स.) जळगाव शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ करीता निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला असून राज्य निवडणूक आयोगाने जळगाव महानगरपालिका हद्दीच्या कार्यक्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू केलेली आहे. या निवडणुकीसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान व १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे.

निवडणुकांच्या अनुषंगाने मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्याची तरतूद आहे. त्यानुसार जळगाव शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ ची प्रक्रिया शांततेत, निर्भय व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी जळगाव महानगरपालिका हद्दीतील सर्व ठोक व किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे आदेश देण्यात येत आहे.

जळगाव शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व ठोक व किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्ती १४ जानेवारी २०२६ (मतदानाच्या अगोदरचा दिवस) संपूर्ण दिवस, १५ जानेवारी २०२६ (मतदानाच्या दिवशी) संपूर्ण दिवस तसेच १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा, १९४९ अन्वये कडक कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, तसेच सर्व संबंधितांनी आदेशाचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी आदेशान्वये केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande