
नंदुरबार, 09 जानेवारी (हिं.स.) एकलव्य मॉडेल रेसिडेन्शिअल स्कूल (EMRS), नंदुरबार येथे इयत्ता सहावी ते नववीच्या प्रवेशासाठी निवड पूर्व परीक्षेच्या अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली असून प्रवेश परीक्षा अर्ज भरण्यास इच्छूक विद्यार्थ्यांनी वेळेत आपले अर्ज सादर करावे असे आवाहन, एकलव्य मॉडेल रेसिडेन्शिअल स्कूलचे प्राचार्य अनिल मंगळे यांनी केले आहे.
अर्जासाठी खालील कागदपत्रे अनिवार्य आहेत :
विद्यार्थी, वडील आणि आई यांचे आधार कार्ड.
जात प्रमाणपत्र
चालू वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र (₹6 लाखांच्या आत)
अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2026 असून इच्छुक विद्यार्थ्यांनी आपली सर्व कागदपत्रे
जवळच्या एकलव्य मॉडेल रेसिडेन्शिअल स्कूलमध्ये वेळेत जमा करावीत. प्रवेश परीक्षा 01 मार्च 2026
रोजी आयोजित करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, निवासी सुविधा आणि सर्वांगीण
विकासाची संधी मिळवण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी व पालकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असेही एकलव्य
मॉडेल रेसिडेन्शिअल स्कूलचे प्राचार्य श्री. मंगळे यांनी कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर