गोविंद यादव यांची आ. डॉ. रत्नाकर गुट्टे मित्र मंडळात विधानसभा संपर्क प्रमुख पदी नियुक्ती
परभणी, 09 जानेवारी (हिं.स.)। गंगाखेड तालुका कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष गोविंद यादव यांनी आज आपल्या सहकार्यांसह आ. डॉ. रत्नाकर गुट्टे काका मित्र मंडळात प्रवेश केला. आ. गुट्टे यांच्या राम सीता सदन या संपर्क कार्यालयात संपन्न झालेल्या या प्रवेश सोहळ्या
गोविंद यादव आ. डॉ. रत्नाकर गुट्टे मित्र मंडळात


परभणी, 09 जानेवारी (हिं.स.)।

गंगाखेड तालुका कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष गोविंद यादव यांनी आज आपल्या सहकार्यांसह आ. डॉ. रत्नाकर गुट्टे काका मित्र मंडळात प्रवेश केला. आ. गुट्टे यांच्या राम सीता सदन या संपर्क कार्यालयात संपन्न झालेल्या या प्रवेश सोहळ्यातच गोविंद यादव यांची गंगाखेड विधानसभा संपर्क प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.

नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद निवडणुकीत पक्ष श्रेष्ठींनी अपेक्षीत पाठबळ न दिल्याचा आरोप करत यादव यांनी कॉंग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष पद आणि कॉंग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. परिसरातील कॉंग्रेसचा प्रमुख चेहरा असलेले गोविंद यादव पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर कोणत्या पक्षात प्रवेश करणार, या बाबत विविध तर्क लावले जात होते. या तर्कवितर्कांना आजच्या प्रवेशाने पुर्णविराम मिळाला आहे.

माजी तालुका उपाध्यक्ष दत्तराव भीसे, नाभीक सेनेचे माऊली डमरे, सुपा ग्रामपंचायतचे उपसरपंच लक्ष्मण घोलप, ग्रा. पं. सदस्य गंगाधर घोलप, सावता शिंदे यांनीही या प्रसंगी मित्र मंडळात प्रवेश केला. सर्व क्षेत्रात क्रियाशील असलेल्या गोविंद यादव यांच्या प्रवेशामुळे मित्रमंडळाचे कार्य अधिक चांगल्या पद्धतीने होईल, असा विश्वास आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी याप्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला. तर आ. गुट्टे यांच्या सहकार्यातून गंगाखेड शहरासह विधानसभा मतदार संघातील विविध विकासकामे करून घेणे आता अधिक सुलभ झाल्याच्या भावना गोविंद यादव यांनी बोलून दाखवल्या.

मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष ॲड. संदिप अळनुरे, जिल्हा संपर्क प्रमुख बालाजी मुंडे, तालुकाध्यक्ष प्रल्हादराव शिंदे, उपसभापती संभाजी पोले, माजी जि. प. सदस्य शंकरराव वाघमारे, प्राचार्य मारोतराव साळवे, नगर परिषदेचे गटनेते ॲड. सय्यद अकबर, नगरसेवक सय्यद चांद, बाळासाहेब बोडखे, सुमित कामत, कासले, ऊद्धव शिंदे, संदिप राठोड, यांचेसह समता परिषदेचे तालुकाध्यक्ष बालासाहेब यादव, अक्षय मेहत्रे, व्यंकटेश यादव, सचिन यादव, प्रथम यादव आदि या प्रसंगी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande