
नाशिक, 09 जानेवारी (हिं.स.)।
- महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी शेवटचा शनिवार आणि रविवार असे दोन दिवस येत असल्यामुळे या दोन दिवसात प्रचाराचा धुरळा उडणार आहे.
नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रचाराचा वेग आता वाढलेला आहे या निवडणुकीकरिता 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे आणि 13 जानेवारीला प्रचार संपणार आहे अजून पर्यंत निवडणूक आयोगाने प्रचाराचा एक दिवस म्हणजे 14 जानेवारी हा दिवस अजून दिलेला नसला तरी तो देण्याची शक्यता प्रशासकीय सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे.
महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला आता मतदारांना भेटण्याच्या आणि सुट्टीचा योग म्हणजे शेवटचा शनिवार आणि रविवार आला असून या दोन दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उमेदवारांनी प्रचाराचे नियोजन केले आहे या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबरीनेच राज्यातील काही मंत्री तसेच काही आमदार हे वेगवेगळ्या प्रभागांमध्ये दौरे आणि सभा घेणार आहेत यामुळे प्रचाराच्या अंतिम टप्प्यामध्ये वेग अजून वाढणार असल्याने मोठ्या प्रमाणावरती रंगत देखील येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV