मनपा निवडणुकीनिमित्त लातूर शहरातील मद्यविक्री राहणार बंद
लातूर, 09 जानेवारी (हिं.स.)। लातूर शहर महानगरपालिका निवडणूक २०२५ अंतर्गत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार मतदान १५ जानेवारी २०२६ रोजी, तर मतमोजणी १६ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. ही निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठ
लातूर महानगरपालिका निवडणुकीनिमित्त लातूर शहरातील मद्यविक्री राहणार बंद


लातूर, 09 जानेवारी (हिं.स.)। लातूर शहर महानगरपालिका निवडणूक २०२५ अंतर्गत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार मतदान १५ जानेवारी २०२६ रोजी, तर मतमोजणी १६ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. ही निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ च्या कलम १३५ (सी) अंतर्गत तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार मतदानापूर्वीचा संपूर्ण दिवस म्हणजे १४ जानेवारी २०२६, मतदानाचा संपूर्ण दिवस १५ जानेवारी २०२६ रोजी लातूर शहर महानगरपालिका क्षेत्राच्या हद्दीतील सर्व अबकारी अनुज्ञप्त्या (मद्य दुकाने) बंद राहतील.

याशिवाय, मतमोजणीच्या दिवशी म्हणजे १६ जानेवारी २०२६ रोजी ज्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे, त्या ठिकाणच्या परिसरातील मद्यविक्री अनुज्ञप्त्याही बंद राहतील. एफएल-२, एफएलबीआर-२, एफएल-३, एफएल-४, एफएलबीआर-११ तसेच ताडी अनुज्ञप्ती इत्यादी सर्व प्रकारच्या मद्यविक्री अनुज्ञप्त्या या कालावधीत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी निर्गमित केले आहेत. याबाबतची कार्यवाही संबंधित यंत्रणांना निर्देशित करण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande