अमरावती : एक प्रभाग एक आमदार; वर्ध्याचे आमदार अमरावतीत…
अमरावती, 09 जानेवारी (हिं.स.)।कोणतीही निवडणूक ही युद्ध म्हणून व ते पण जिंकण्यासाठीच लढणार, हा भाजपचा बाणा ठरला आहे. नगर पालिका पाठोपाठ आता महापालिका निवडणुकीत पण तेच तंत्र ठेवून भाजपजन कामाला लागल्याचे चित्र आहे. मतदार यादीचा पन्नाप्रमुख ते थेट मुख
महापालिका मोर्चेबांधणी ! एक प्रभाग एक आमदार; वर्ध्याचे आमदार अमरावतीत…


अमरावती, 09 जानेवारी (हिं.स.)।कोणतीही निवडणूक ही युद्ध म्हणून व ते पण जिंकण्यासाठीच लढणार, हा भाजपचा बाणा ठरला आहे. नगर पालिका पाठोपाठ आता महापालिका निवडणुकीत पण तेच तंत्र ठेवून भाजपजन कामाला लागल्याचे चित्र आहे. मतदार यादीचा पन्नाप्रमुख ते थेट मुख्यमंत्री अशी मंडळी या निवडणुकीत भिडली असून त्यांना विविध जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. विदर्भात अमरावती महापालिकेच्या निवडणूकीत भाजपने अशीच प्रतिष्ठा पणाला लावली.

ही निवडणूक जिंकून देण्याच्या व्यूहरचनेत वर्धा जिल्ह्यातील आमदार सहभागी झाले आहेत. राज्यमंत्री डॉ. पंकज राजेश भोयर तसेच आमदार सुमित वानखेडे व राजेश बकाने यांना जबाबदारी मिळाली. आमदार बकाने सांगतात की प्रत्येक आमदारास फक्त एका प्रभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्या प्रभागात प्रचार नियोजन, सभा आयोजन, अडचणी समजून घेणे, प्रभागातील पक्षीय भेद दूर करणे, मतदार केंद्र व्यवस्थापण, पन्नाप्रमुख समन्वय व अन्य कामे आमच्याकडे आहेत. मी संघटनेत जिल्हा व प्रदेश पातळीवार काम केले आहे. त्या अनुभवाचा फायदा निवडणुकीत होईल. भाजप नेत्या नवनीत राणा या पक्षाच्या उमेदवाराचे काम मनापासून करीत आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सभेत त्यांनी ते स्पष्ट करून टाकले आहे. त्यामुळे त्यांच्या निष्ठावर शंका घेण्याचे कारण नाही. माझ्या वाटेला आलेल्या प्रभागातील भाजपचे चारही उमेदवार जिंकतील, असा विश्वास आमदार बकाने व्यक्त करतात.

तर आमदार सुमित वानखेडे म्हणाले की अमरावतीच्या २२ प्रभागाची जबाबदारी २२ आमदारांना वाटून देण्यात आली आहे. अमरावती, वर्धा व यवतमाळ येथील भाजप आमदार या २२ प्रभागात ठाण मांडून आहेत. नियोजन, देखरेख व विविध पातळीवार आम्ही दिलेल्या प्रभागात काम करीत आहे. संबंधित उमेदवार आमच्याकडे अडचण घेऊन आल्यास ती आवश्यक त्या मार्गाने दूर करण्याची जबाबदारी पक्षाने दिली आहे, असे आमदार वानखेडे सांगतात.

अमरावती महापालिकेच्या २२ प्रभागातील ८७ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. एका प्रभागातून चार नगरसेवक निवडल्या जातील. मोठे प्रभाग असल्याने चारही उमेदवारातील समन्वय आवश्यक ठरतो. तेच काम हे बाहेरचे आमदार अमरावतीत करीत आहे. स्थानिक पातळीवर भाजप नेत्या नवनीत राणा यांचे अनेक भाजप नेत्यांशी खटके उडाले आहे. मात्र वर्धेतील एक मंत्री व दोन आमदार यांच्या खांद्याला खांदा लावून नवनीत राणा यांनी प्रचारात झोकून दिल्याचे चित्र दिसून आले. भाजपशी गद्दारी करणाऱ्यांना माफी नाही, अशी गर्जना पण त्यांनी करून टाकली आहे. भाजपच्या मुख्य प्रचार कार्यालयात राणा यांनी आमदार सुमित वानखेडे यांच्या सोबत पूर्णवेळ हजर राहून प्रचार सूत्र समजून घेतले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande