
अमरावती, 09 जानेवारी (हिं.स.) | मनपा निवडणुकीत मतदान करण्यासाठी १२ पुराव्याची गरज आहे. यामध्ये १) भारताचा पासपोर्ट, २) आधार ओळखपत्र, ३) वाहन चालविण्याचा परवाना, ४) पॅन ओळखपत्र, ५) राज्य शासनाचे फोटो ओळखपत्र, ६). राष्ट्रीयकृत बँका अथवा पोस्ट ऑफीस पासबुक, ७) सक्षम प्राधिकाऱ्याचा फोटोसहित अपंग त्वाचा दाखला, ८) राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेखालील फोटो असलेले ओळखपत्र मनरेगा जॉब कार्ड, ९) निवृत्त कर्मचाऱ्यांची अथवा त्यांच्या विधवा/अवलंबित व्यक्तीयांची फोटो असलेली निवृती वेतन कागदपत्रे १०) लोकसभा/सचिवालय, राज्यसभा विधानसभा/ विधान परिषद/सचिवालय यांनी सदस्यांना दिलेले अधिकृत ओळखपत्र ११) स्वातंत्र्य सैनिकाचे फोटो असलेले ओळखपत्र, १२) श्रम मंत्रालय आरोग्य विमा योजनेचे फोटोसह कार्ड, आदींचा समावेश आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी