
पुणे, 09 जानेवारी (हिं.स.)।
‘संकल्प बोलके हम तो निकल पडे... विजयी भव’, ‘आपलीच हवा...’, ‘लढ रे तू बळीराजा...’, ‘दंगल दंगल... ’, ‘लक्ष्य तो हर हाल में पाना है...’, ‘तू चाल पुढं, तुला रं गड्या भीती कशाची...’ अशा विविध गीतांवर प्रचारांचे रील्स आपण इन्स्टाग््रााम अन् फेसबुक पाहताना नजरेस पडलेच असतील... कारण उमेदवारांच्या प्रचारांच्या रील्सची सोशल मीडियावर धूम असून, हिंदी-मराठी अन् अगदी दाक्षिणात्य चित्रपटातील गीतांवरील रील्सची सध्या हवा आहे.महापालिकेच्या निवडणुकांमध्ये प्रचारासाठी रील्सचा फंडा सर्वाधिक वापरला जात असून, उमेदवारांच्या सोशल मीडिया टीमकडून दिवसभरात सुमारे पाच ते दहा रील्स अपलोड केले जात आहेत. प्रचारफेरी, सभा, मतदारांशी भेटगाठी, मोहिमांच्या विविध गीतांवरील रील्सची चलती आहे. विधानसभा निवडणुकांमध्ये उमेदवारांकडून इन्स्टाग््रााम, फेसबुक आणि यू-ट्युबवर प्रचारासाठी रील्सचा फंडा सर्वाधिक वापरण्यात आला, हेच चित्र महापालिकेच्या निवडणुकांमध्येही पाहायला मिळत आहे. इन्स्टाग््रााम, फेसबुकवर रील्सची चलती असून, रील्सद्वारे उमेदवारांचा दमदार प्रचार केला जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु