नांदेडमध्ये खा. तटकरे यांची जाहीर सभा, पक्ष जाहीरनाम्याचे प्रकाशन
नांदेड, 09 जानेवारी (हिं.स.)। नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व खासदार सुनील तटकरे यांची भव्य जाहीर सभा नांदेड
जाहीरनाम्याचे प्रकाशन


नांदेड, 09 जानेवारी (हिं.स.)। नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व खासदार सुनील तटकरे यांची भव्य जाहीर सभा नांदेड येथे पार पडली. यावेळी पक्षाच्या जाहीरनाम्याचे अधिकृत प्रकाशन करण्यात आले.

या सभेदरम्यान मीनाक्षी कागडे, डॉ. शिवाजीराव कागडे, राजेश पाटील, शिवराज कांबळे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाहीर पक्षप्रवेश केला. सर्व नवप्रवेशितांचे राष्ट्रवादी परिवारात स्वागत करण्यात आले तसेच त्यांच्या पुढील यशस्वी राजकीय वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या.सभेत सुनील तटकरे म्हणाले की, नांदेडच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कटिबद्ध असून भविष्यातही विकासाभिमुख धोरण राबविले जाईल. “२५ वर्षांपूर्वी पिंपरी-चिंचवडकरांनी दादांना कारभारी म्हणून निवडले आणि त्या शहराने अभूतपूर्व प्रगती अनुभवली. त्याच धर्तीवर नांदेडचा विकास घडवायचा आहे,” असे त्यांनी सांगितले. काही लोकांनी शहराच्या विकासाऐवजी स्वतःचा विकास केल्याचा आरोप करत, आता ही परिस्थिती बदलण्याची वेळ आली असल्याचेही त्यांनी नमूद केले.

केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या निधीमध्ये नांदेडला झुकते माप दिले जाईल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला महानगरपालिकेची सत्ता देण्याचे आवाहन केले. तसेच पेट्रोलियम अँड नैसर्गिक गॅस कमिटीचे चेअरमन या नात्याने सीएसआर फंडातून नांदेडच्या विकासासाठी एक कोटी रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन दिले. “घड्याळाचे बटण दाबून राष्ट्रवादीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा,” असे आवाहन त्यांनी नांदेडकरांना केले.याप्रसंगी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष तथा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष सौ. रुपालीताई चाकणकर, आमदार प्रतापराव चिखलीकर, माजी खासदार भास्करराव खतगावकर, प्रदेश प्रवक्ते सूरज चव्हाण, नगरसेवकपदाचे उमेदवार, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नांदेडकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande