
नांदेड, 09 जानेवारी (हिं.स.)।
राज्याचे महसूल मंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे यांनी नांदेड येथील भारतीय जनता पक्षाचे खासदार माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या घरी सदिच्छा भेट दिली.
नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नांदेड जिल्ह्यात तळ ठोकून आहेत. नांदेड वाघाळ महानगरपालिका भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात यावी यासाठी त्यांनी अनेक बैठका घेतल्या आहेत विशेष म्हणजे स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून मतदारांना थेट भेटीवरही त्यांनी भर दिला आहे त्यांच्या समवेत खासदार अशोक चव्हाण आणि स्थानिक नेते पदाधिकारी आहेत. नांदेड येथील खासदार अशोक चव्हाण यांचे शिवाजीनगर येथे निवासस्थान आहे. प्रचाराच्या दरम्यान विशेष निवासस्थानी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट दिली आहे.
यावेळी खा.डॉ. अजित गोपछडे, माजी पालकमंत्री डी.पी. सावंत, भाजपचे नांदेड महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर, नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis