बीड : एसपींकडून विद्यार्थ्यांना शिस्त, सुरक्षिततेचा मंत्र
बीड, 09 जानेवारी (हिं.स.)। बीड जिल्ह्याचे (एसपी) पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्याकडून विद्यार्थ्यांना शिस्त, सुरक्षिततेचा मंत्र देण्यात आले चुकीच्या एका क्लिकमुळे संपूर्ण आयुष्य बिघडू शकते, असे त्यांनी सांगितले. बीड येथील पोलिस अधीक्षक कार्यालया
बीड : एसपींकडून विद्यार्थ्यांना शिस्त, सुरक्षिततेचा मंत्र


बीड, 09 जानेवारी (हिं.स.)। बीड जिल्ह्याचे (एसपी) पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्याकडून विद्यार्थ्यांना शिस्त, सुरक्षिततेचा मंत्र देण्यात आले चुकीच्या एका क्लिकमुळे संपूर्ण आयुष्य बिघडू शकते, असे त्यांनी सांगितले.

बीड येथील पोलिस अधीक्षक कार्यालयात विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यशाळा झाली. पोलिस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर आणि प्रशिक्षणार्थी आयपीएस राहुल कुमार यांच्या उपस्थितीत ही कार्यशाळा पार पडली. श्री. शिवाजी विद्यालय आणि संस्कार विद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते.

पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. त्यांनी शिस्त, जबाबदारी, निर्व्यसनी जीवनशैली आणि सोशल मीडियाचा योग्य वापर यावर भर दिला. विद्यार्थ्यांनी असे ज्ञान मिळवावे की त्याचा उपयोग स्वतःला, समाजाला आणि देशालाही व्हावा, असेही असेही त्यांनी स्पष्ट केले. कार्यशाळेनंतर पोलीस उपनिरीक्षक विजय जाधवर आणि पोलीस हवालदार बाळासाहेब नागरगोजे यांनी विद्यार्थ्यांना पोलिस नियंत्रण कक्षात नेले.

तेथे पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी बटेवाड, सायबर शाखेचे निरीक्षक संदीप अराक, अनैतिक मानवी प्रतिबंधक शाखेच्या उपनिरीक्षक पल्लवी जाधव, दहशतवादी विरोधी पथकाचे पोलिस अधिक्षक नवनीत काँवत यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. पीएसआय शेखर औटे, जिल्हा विशेष शा विशेष शाखेचे निरीक्षक मुकुंद कुलकर्णी आणि वाहतूक शाखेचे सपोनि सुभाष सानप यांच्याशी विद्याथ्यांनी संवाद साधला. या वेळी शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र वाघमारे, शिक्षक अमोल वाघमारे आणि शंकर सांगळे उपस्थित होते. संस्कार विद्यालयाचे मुख्याध्यापक दीपक सरदे, अधिकारी राजेश राजहंस, शिक्षक रामदास भोसले आणि बापू भोसले यांचीही उपस्थिती होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande