सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज यात्रेची तयारी सुरू
सोलापूर, 09 जानेवारी (हिं.स.)। सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांची ही यात्रा दरवर्षी मकर संक्रांतीच्या काळात मोठ्या भक्तिभावात साजरी केली जाते. याची तयारी जोरात सुरु आहे . या यात्रेसाठी मुंबई, पुणे, हैद्राबाद सह कर्नाटकातील
Siddeswar


सोलापूर, 09 जानेवारी (हिं.स.)।

सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांची ही यात्रा दरवर्षी मकर संक्रांतीच्या काळात मोठ्या भक्तिभावात साजरी केली जाते. याची तयारी जोरात सुरु आहे . या यात्रेसाठी मुंबई, पुणे, हैद्राबाद सह कर्नाटकातील अनेक भागातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.यात्रेची सुरुवात सिद्धरामेश्वरानी शहरात स्थापन केलेल्या ६८ लिंगांवर तेलाभिषेक करण्यापासून होते. याविधीत स्थानिक भाविक पारंपरिक बाराबंदी वेशभूषा परिधान करून मोठ्या श्रद्धेने सहभागी होतात.ही यात्रा केवळ धार्मिक सोहळा नसून, समाजात एकता, भक्ती आणि परंपरेचे दर्शन घडवणारी एक महत्त्वाची परंपरा आहे. यात्रेदरम्यान विविध धार्मिक विधी, प्रार्थना, भजन-कीर्तन आणि दर्शनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराज यात्रेतील अक्षता सोहळा व इतर धार्मिक विधींचे प्रतीक असलेला बस्ता बांधण्याचा कार्यक्रम आहे. परंपरेप्रमाणे लागणारे पोषाख व इतर वस्तूंची खरेदी करण्यासाठी मानकऱ्यांची सेवा आजपासून सुरू होईल. यात्रेतील प्रमुख मानकरी आणि सिद्धेश्वर देवस्थान समितीचे पदाधिकारी वाजत-गाजत बाजारपेठेतील विविध दुकानांमध्ये जातात.दुकानाचे मालक मानकऱ्यांचा सत्कार करतात. त्यानंतर विधीवत बस्ता बांधला जातो. बस्ता खरेदी केल्यानंतर तो मंदिरात नेऊन देवाच्या चरणी अर्पण केला जातो. या सोहळ्यासाठी मानकरी, हिरेमठ कुटुंबीय आणि भक्तगणांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande