सोलापूर - इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांची १५ एप्रिलपूर्वी अंतिम सत्र परीक्षा
सोलापूर, 09 जानेवारी (हिं.स.)। इयत्ता चौथी व सातवी आणि इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची २२ फेब्रुवारी रोजी आणि चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा २
सोलापूर - इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांची १५ एप्रिलपूर्वी अंतिम सत्र परीक्षा


सोलापूर, 09 जानेवारी (हिं.स.)। इयत्ता चौथी व सातवी आणि इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची २२ फेब्रुवारी रोजी आणि चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा २६ एप्रिल रोजी होणार आहे. मागील वर्षीपासून शैक्षणिक वर्षातील अंतिम सत्र परीक्षा एप्रिलच्या तिसऱ्या व चौथ्या आठवड्यात घेतली जात आहे. पण, शिष्यवृत्ती परीक्षेमुळे चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांची अंतिम सत्र परीक्षा १५ एप्रिलपूर्वीच पार पडणार आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमधील इयत्ता पाचवी व आठवीतील सुमारे नऊ हजार ५९५ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेला बसले आहेत. तर चौथी आणि सातवीतील सुमारे २१ हजार विद्यार्थी परीक्षेला बसतील, असा अंदाज आहे. त्या विद्यार्थ्यांना २ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यानंतर मात्र २८ फेब्रुवारीपर्यंत विद्यार्थ्यांना विलंब, अतिविलंब व अति विशेष विलंब शुल्क मोजावे लागणार आहे. परीक्षेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांचे शुल्क जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून भरले जाणार आहे. यंदा चार वर्गाची शिष्यवृत्ती परीक्षा होणार असल्याने जिल्हा परिषदेला ५० लाख रुपये द्यावे लागणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande