
बीड, 09 जानेवारी (हिं.स.)। बीड शहरातील द्वारकादास मंत्री राजस्थानी विद्यालयात किशोरवयीन मुलींच्या वाढीविकासासाठी 'कळी उमलताना' कार्यक्रम झाला. प्रमुख पाहुण्या म्हणून आयुर्वेदाचार्य डॉ. नरवडे उपस्थित होत्या. त्यांनी मुलींशी मनमोकळा संवाद साधला. क्यात येताना शरीरात होणारे बदल, त्यांना सामोरे जाण्याचे मार्ग, आहार-विहाराचे महत्त्व यावर त्यांनी मार्गदर्शन केले.
मासिक पाळी सुरू होण्यापूर्वी आणि नंतरही योग्य आहाराचे महत्त्व त्यांनी उदाहरणांसह समजावले. जंक फूडपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. योग्य आहारामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते, हे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य लाहोटी होते.
-------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis