
छत्रपती संभाजीनगर, 09 जानेवारी (हिं.स.)। लाडगाव ता.छत्रपती संभाजीनगर येथील अदिती लॉन्स येथे भाजपा कार्यकर्ता मेळावा व नवनिर्वाचित कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री.श्रीराम बाबा शेळके यांचा सत्कार समारंभ माजी केंद्रीय मंत्री .रावसाहेब दानवे दादा व आमदार सौ.अनुराधा ताई चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वानी संघटितपणे काम करून 'शत प्रतिशत भाजप' करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले.
तसेच बाबांचा सत्कार करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis