
बीड, 09 जानेवारी (हिं.स.)।
बीड जिल्ह्यातील आमदार सुरेश धस यांच्या पुढाकारातून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून तीन गोरगरीब रुग्णांना २ लाख २० हजारांचे अर्थसहाय्य मिळाले. या मदतीमुळे संबंधित कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला.
कुसळंब येथील ऊसतोड कामगार अशोक बलभीम पवार यांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला. आमदार सुरेश धस यांनी तातडीने अमर वाळके आणि विकास साळवे यांना पूर्ण करण्याच्या कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण सूचना दिल्या. त्यानुसार साई अमृत हॉस्पिटलच्या खात्यावर ६० हजारांची मदत जमा झाली. खुंटेफळ पुंडी येथील गणेश नामदेव पगारे आणि त्यांच्या शेजारी राहणारी वैष्णवी अंकुश ढोले यांचा अहमदनगर येथे अपघात झाला. दोघांनाही गंभीर दुखापत झाली. अमर वाळके यांच्या माध्यमातून कागदपत्रे सादर झाली. ६ जानेवारी रोजी वैष्णवी ढोले यांच्या उपचारासाठी १ लाख, तर गणेश पगारे यांच्यासाठी ६० हजार रुपये थेट रुग्णालयाच्या खात्यावर जमा झाले.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis