मनपा शाळांमध्ये मोफत शिक्षण, वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा
छत्रपती संभाजीनगर, 09 जानेवारी (हिं.स.)।मनपा शाळांमध्ये मोफत शिक्षण, प्रत्येक वॉर्डात ''महात्मा जोतिबा क्लिनिक'' आणि दहा प्रभागात ३०० खाटांचे सुविधायुक्त रुग्णालय उभारू. तसेच समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण करुन शहरात २४ तास पाणीपुरवठा करू, अशी प्रमु
अ


छत्रपती संभाजीनगर, 09 जानेवारी (हिं.स.)।मनपा शाळांमध्ये मोफत शिक्षण, प्रत्येक वॉर्डात 'महात्मा जोतिबा क्लिनिक' आणि दहा प्रभागात ३०० खाटांचे सुविधायुक्त रुग्णालय उभारू. तसेच समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण करुन शहरात २४ तास पाणीपुरवठा करू, अशी प्रमुख आश्वासने असलेला वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला.

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने क्रांती चौक येथील मध्यवर्ती कार्यालयात 'बहुजनांचा जाहीरनामा' प्रकाशित केला. या वेळी जिल्हा प्रभारी अरुंधती शिरसाट, जिल्हाध्यक्ष रुपचंद गाडेकर, रामेश्वर तायडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, पायाभूत सुविधा आणि वाहतूक, सुरक्षा आणि ई-गव्हर्नन्स, स्वच्छता, पर्यावरण आणि कामगार कल्याण, कर सवलत आणि गृहनिर्माण, पर्यटन, संस्कृती आणि व्यापार, महिला सक्षमीकरण या मुद्द्यांवर पक्षाने भूमिका जाहीर केली आहे. प्रत्येक प्रभागात जागतिक दर्जाच्या सीबीएसई बोर्डाच्या शाळा आणि शाळांचे 'स्मार्ट क्लासरुम' मध्ये रुपांतर करुन टॅब्लेट व हायस्पीड इंटरनेटची सुविधा देण्यात येईल. प्रत्येक वॉर्डात महात्मा

जोतिबा क्लिनिक, मनपा रुग्णालयात मोफत उपचार व औषधी देणार, दहा विभागात आधुनिक तंत्रज्ञानाचे जलशुद्धीकरण केंद्र आणि २४ तास पाणीपुरवठा करणार, महिला आणि शालेय विद्यार्थ्यांना स्मार्ट सिटीबस प्रवास मोफत देणार, रस्ते खड्डेमुक्त व धूळमुक्त करणार, मनपा बससेवेत २०० नवीन बसची भर घालणार, असे जाहीरनाम्यात म्हटले आहे.

शहरात एआय आधारीत सीसीटीव्ही कॅमेरे आणि रात्रीची गस्त वाढवून महिलांची सुरक्षा निश्चित करणार, शून्य कचरा संकल्पनेनुसार प्रभागनिहाय प्रक्रिया केंद्रे उभारणार आणि मनपातील कंत्राटी भरती बंद करुन कायमस्वरुपी भरती करणार, तसेच भूमिगत सांडपाणी व्यवस्थेचे आधुनिकीकरण करणार असल्याचे आश्वासन देण्यात आले.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande