
नांदेड, 09 जानेवारी (हिं.स.)। शेगावचे राणा प्रसिध्द संत श्री गजानन महाराज यांच्या भक्त परिवाराने जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या रविवारी पवित्र श्री विजय ग्रंथाचे भव्य जागतिक पारायण सोहळा सुरु केला आहे. यावर्षी दि. ११ जानेवारी रविवारी शहरातील गजानन महाराज मंदिरात विजय ग्रंथ पारायण सोहळा आयोजित केला आहे.
हा पारायण सोहळा रविवारी सकाळी ७.३० पासून श्री गजानन महाराज मंदिर येथे होणार आहे. गणेश कामजे हे ग्रंथाचे वाचन करणार आहेत. गजानन ग्रंथ पारायणासाठी इच्छूक भक्तांची संख्या वाढली तर बाजूच्या मंदिरात पारायण सोहळ्याची व्यवस्था केली जाणार आहे. जागतिक पातळीवर सर्वत्र शांतता आणि सकल मानवी जातीच्या कल्याणासाठी महाराजांची कृपा प्राप्त व्हावी अध्यात्मिक सकारात्मक दृष्टीने जागतिक पारायण सोहळा एकाच दिवशी एकाच वेळी संपूर्ण जगभरात भक्तगणांनी सुरु केले आहे. यंदाचे १२ वे वर्ष आहे.
मुखेडमधील पारायण सोहळ्यासाठी भाविकांना श्री विजय ग्रंथ मोफत पुरविला जाणार आहे. या सोहळयाची तयारी करण्यात आली असून अंदाजे अडीचशे भाविक सहभागी होण्याची शक्यता आहे. ग्रंथ समाप्ती नंतर आरती, महाप्रसाद वितरण करण्यात येणार आहे. तालुक्यात कुठल्याही गावात मंदिरात ग्रंथ पारायणासाठी इच्छूक भाविकांनी श्री विजय ग्रंथासाठी मुखेडच्या गजानन महाराज मंदिर येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis