साेलापूर जि. प. सदस्यांना मिळणार १० कोटींचा निधी
सोलापूर, 9 जानेवारी, (हिं.स.)। जानेवारी महिन्यात निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जिल्हा परिषदेच्या नवीन पदाधिकाऱ्यांची पहिली सर्वसाधारण सभा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मार्च महिन्यात जिल्हा परिषद
ZP news solpaur


सोलापूर, 9 जानेवारी, (हिं.स.)। जानेवारी महिन्यात निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जिल्हा परिषदेच्या नवीन पदाधिकाऱ्यांची पहिली सर्वसाधारण सभा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मार्च महिन्यात जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प असणार आहे. यामुळे नव्याने आलेल्या पदाधिकाऱ्यांना पहिल्याच बैठकीत विकास कामांना निधी देण्यासाठी १० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. १० ते २० लाख रुपये प्रत्येक सदस्यांना मिळावेत, यासाठी प्रशासनाकडून तरतूद करण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेकडे सेस फंडातून ४४ कोटी़ंचा निधी संकलित होतो. यातून २०२५-२६ या वर्षात २५ कोटी रुपयांपर्यंत विकास कामांना निधी दिला आहे. पालकमंत्री व संबंधित मतदारसंघातील लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार निधीचे वाटप करण्यात आले आहे. या कामांना प्रशासकीय मान्यताही देण्यात आल्या आहेत. यामुळे आता उर्वरित निधीतून लोकप्रतिनिधींना निधीचे वाटप करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande