
छत्रपती संभाजीनगर, 09 जानेवारी (हिं.स.)। डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा पहिला केंद्रीय लोककला महोत्सव ११ व १२ जानेवारी रोजी होणार आहे. विविध महाविद्यालयातील चारशे कलावंतर चार रंगमंचावरुन विविध ११ कलाप्रकारांचे सादरीकरण करणार आहेत. महाविद्यालयांसाठी महोत्सवातील सहभाग ऐच्छिक होता. चार जिल्ह्यातील ४८८ पैकी ६३ महाविद्यालयांचे विद्यार्थी कलावंत सहभागी होत आहेत.
विद्यापीठ प्रशासनाने लोककला महोत्सव घेण्याचे युवक महोत्सवात घोषित केले. त्याप्रमाणे यंदाच्या केंद्रीय युवक महोत्सवात लोककला वगळून बाकी कलाप्रकार येण्यात आले. २७ ते २९ सप्टेंबर या काळात झालेल्या युवक महोत्सव ४८७ पैकी २६३ महाविद्यापीठांचे संघ सहभागी झाले. यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात ११ व १२ जानेवारी रोजी 'केंद्रीय लोककला महोत्सव' विद्यापीठ परिसरात होणार आहे.66 लोककला महोत्सवात विविध कलाप्रकारांचे सादरीकरण होणार आहे.
लोककला महोत्सवात ११ कला प्रकार सादर होणार आहेत. यासाठी लोकरंग (नाट्यगृह), भावरंग (नाट्यगृहाच्या बाजूला) स्वररंग (नाट्यशास्त्र विभाग), शब्दरंग (नाटयगृह) या रंगमंचावर कला सादर होतील. यामध्ये पोवाडा, गोंधळ, भजन, भारुड, लावणी, लोकगीत, लोकनाट्य, वासुदेव, कवाली, जलसा व कविता असे कलाप्रकार असणार आहेत. काव्यवाचन व वासुदेव ही कलाप्रकार वैयक्तिक गटात तर उर्वरित सांघिक कला प्रकार असणार आहेत. ३७७ कलावंत सहभागी होणार आहेत. यापैकी मुले १७५ व २०२ मुलींचा सहभाग आहे. तर सांस्कृतिक समन्वयक तथा संघ व्यवस्थापक म्हणून दीडशेपेक्षा अधिक प्राध्यापकांचा समावेश आहे.
महोत्सवासाठी महाविद्यालयांचा सहभाग ऐच्छिक होता. चार जिल्ह्यातील केवळ ६३ महाविद्यालयांनी महोत्सवासाठी
उत्सुकता दाखविली. महोत्सवाचे उदघाटन नाट्यगृहात रविवारी सकाळी ९.३० वाजता होणार आहे. कवी प्रा. प्रशांत मोरे, कुलगुरू डॉ.
विजय फुलारी, प्रकुलगुरू डॉ. वाल्मिक सरवदे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तर सोमवारी (१२ जानेवारी)
सायंकाळी सहा वाजता पारितोषिक वितरण, समारोप समारंभनाट्यगृहातच होणार आहे. रंगकर्मी डॉ. गणेश चंदनशिवे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
केंद्रीय लोककला महोत्सवात चार जिल्हयातून ६३ संघानी सहभाग नोंदविला आहे. त्यात महाविद्यालयांच्या ६१ संघानी नोंदणी केली आहे. तसेच विद्यापीठ आणि उपपरिसराचा प्रत्येकी एक संघ असे ६३ संघ सहभागी होणार आहेत. यातध्ये बीड- १२, छत्रपती संभजीनगर ३९, धारशीव -४ आणि जालनातील ८ संघाचा समावेश आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis