सामाजिक मानसिक आरोग्य क्षेत्रात सूक्ष्म संशोधनाची आवश्यकता - प्रा. डॉ. विश्‍वनाथ रासवे
परभणी, 09 जानेवारी (हिं.स.)। सामाजिक मानसिक आरोग्य क्षेत्रात सूक्ष्म संशोधनाची नितांत आवश्यकता आहे, त्यासाठी विद्यार्थी अभ्यासकांनी प्रत्यक्ष समाजात सहभाग घेऊन विविध शास्त्रीय पद्धतीचा वापर करून समाजाभिमुख संशोधन करावे, असे आवाहन प्रा. डॉ. विश्व‍
सामाजिक मानसिक आरोग्य क्षेत्रात सूक्ष्म संशोधनाची आवश्यकता - प्रा. डॉ. विश्‍वनाथ रासवे


परभणी, 09 जानेवारी (हिं.स.)।

सामाजिक मानसिक आरोग्य क्षेत्रात सूक्ष्म संशोधनाची नितांत आवश्यकता आहे, त्यासाठी विद्यार्थी अभ्यासकांनी प्रत्यक्ष समाजात सहभाग घेऊन विविध शास्त्रीय पद्धतीचा वापर करून समाजाभिमुख संशोधन करावे, असे आवाहन प्रा. डॉ. विश्व‍नाथ रासवे यांनी केले.

येथील शारदा महाविद्यालयात मानसशास्त्र विभागाच्या वतीने एम. ए. प्रथम, द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांकरिता संशोधन मार्गदर्शन वर्ग घेण्यात आला. त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. शामसुंदर वाघमारे, प्रा. डॉ. एन. व्ही. सिंगापुरे, प्रा. डॉ. गोपाल पेदापल्ली, प्रा. माणिक लिंगायत, प्रा. सानिया सदफ उपस्थित होते. यावेळी अध्यक्षीय समारोपात उपप्राचार्य डॉ. वाघमारे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी मानसशास्त्र प्रयोगशाळेसह ग्रंथालयाचा वापर करून अधिकाधिक संशोधन करावे, स्व विकासासह राष्ट्र विकासात योगदान द्यावे, असे आवाहन केले. यावेळी विद्यार्थी संशोधकांनी आपले संशोधन प्रस्ताव पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन सह सादर केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande