
छत्रपती संभाजीनगर, 16 मार्च (हिं.स.)।
छ संभाजीनगर शहरातील वाढती वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिका प्रशासनाने कंबर कसली असून कांचनवाडी भागात मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. पैठण रोड ते धुळे-सोलापूर मार्गाला जोडणाऱ्या २ किलोमीटर लांबीच्या डीपी रस्त्यावरील तब्बल १०१ बांधकामे महापालिकेने जमीनदोस्त केली आहेत. या धडक कारवाईमुळे गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला रस्ते रुंदीकरणाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.अतिक्रमण विभागाने कांचनवाडी परिसरात कारवाईला सुरुवात केली. यामध्ये ६३ पक्की घरे, दुकाने आणि ३८ कच्ची बांधकामे, शेड, कंपाउंड आणि ओट्यांचा समावेश होता. या कारवाईमुळे पैठण रस्ता आता थेट धुळे-सोलापूर महामार्गाला जोडला जाणार आहे. पर्यायी मार्ग उपलब्ध झाल्याने पैठण रोडवरील प्रवाशांची वाहतूक कोंडीतून कायमची सुटका होणार आहे.ही मोहीम फत्ते करण्यासाठी महापालिकेचे ६० अधिकारी-कर्मचारी आणि ४० पोलीस कर्मचाऱ्यांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.धुळे-सोलापूर महामार्गाला जोडणारा २ किमीचा मार्ग मोकळा
झाला आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis