शिवसेनेच्या पाथरी शहरप्रमुखपदी लालू खान यांची निवड
परभणी, 16 मार्च (हिं.स.)। पाथरी शहरातील शिवसेना संघटना अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने माजी नगरसेवक आयुब उर्फ लालू खान यांची शिवसेना शिंदे गटाच्या पाथरी शहरप्रमुखपदी एकमताने निवड करण्यात आली. शिवसेना नेते तथा जिल्हाप्रमुख सईद खान यांच्या उपस्थितीत
Q


परभणी, 16 मार्च (हिं.स.)। पाथरी शहरातील शिवसेना संघटना अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने माजी नगरसेवक आयुब उर्फ लालू खान यांची शिवसेना शिंदे गटाच्या पाथरी शहरप्रमुखपदी एकमताने निवड करण्यात आली. शिवसेना नेते तथा जिल्हाप्रमुख सईद खान यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली.

निवड जाहीर झाल्यानंतर सईद खान यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात नवनियुक्त शहरप्रमुख आयुब उर्फ लालू खान यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा देत त्यांच्या नेतृत्वाखाली पाथरी शहरातील शिवसेना संघटना अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला. आयुब उर्फ लालू खान यांनी यापूर्वी तब्बल पंधरा वर्षे नगरसेवक म्हणून काम केले असून संघटनात्मक कार्यातील सक्रियता आणि धडक कार्यशैलीमुळे त्यांनी राजकीय क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या निवडीमुळे पाथरी शहरातील शिवसेना संघटनेला नवचैतन्य मिळेल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande