
छत्रपती संभाजीनगर, 16 मार्च (हिं.स.)।
अंबादास दानवे यांना धमकीचे फोन आले असून पोलिसांत तक्रार दिल्याची माहिती हाती आली आहे
शिवसेना नेते तथा माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना अज्ञात व्यक्तीकडून धमकीचे फोन आल्याची घटना समोर आली आहे. याबाबत त्यांनी क्रांती चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार १५ मार्च रोजी रात्री सुमारे २ वाजता वारंवार फोन करून शिवीगाळ करण्यात आली तसेच “कापून टाकू, ठोकून टाकू” अशा शब्दांत धमकी देण्यात आली. यापूर्वी ११, १२, १३ आणि १४ मार्च रोजीदेखील अशाच प्रकारचे कॉल आल्याचे त्यांनी नमूद केले आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद करून तपास सुरू केला असून कॉलचा स्रोत शोधण्याचे काम सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis