जनतेच्या समस्या तत्परतेने सोडवण्यासाठी संपर्क कार्यालय प्रभावी माध्यम व्हावे - मंत्री अतुल सावे
छत्रपती संभाजीनगर, 16 मार्च (हिं.स.)। जनतेच्या समस्या तत्परतेने सोडवण्यासाठी आणि नागरिकांशी सातत्यपूर्ण संवाद साधण्यासाठी हे संपर्क कार्यालय प्रभावी माध्यम ठरेल, असा विश्वास आहे. असा आशावाद दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला. भारतीय जनता
अ


छत्रपती संभाजीनगर, 16 मार्च (हिं.स.)। जनतेच्या समस्या तत्परतेने सोडवण्यासाठी आणि नागरिकांशी सातत्यपूर्ण संवाद साधण्यासाठी हे संपर्क कार्यालय प्रभावी माध्यम ठरेल, असा विश्वास आहे. असा आशावाद दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून नागरिकांची कामे वेळेवर व्हवी असेही ते म्हणाले. सावे यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील नगरसेवक रेणुकादास (राजू) वैद्य यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले. या वेळी त्यांनी संवाद साधला.

छत्रपती संभाजीनगर येथील प्रभाग क्र.२७ मध्ये नगरसेवक रेणुकादास (राजू) वैद्य यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात पार पडले. या प्रसंगी पक्षाचे नेते, नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande