
छत्रपती संभाजीनगर, 16 मार्च (हिं.स.)।
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजप आणि शिवसेनेत अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत मंत्री अतुल सावे व संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर निर्णय झाला आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक १८ मार्च रोजी होणार असून पहिली अडीच वर्षे कोणत्या पक्षाकडे अध्यक्षपद राहणार, याचा अंतिम निर्णय होणार आहे. जिल्हा परिषदेत भाजपचे २३ तर शिवसेनेचे २१ सदस्य असल्याने दोन्ही पक्षांकडून अध्यक्षपदावर दावा करण्यात येत आहे. महायुतीतच सत्तास्थापना होणार असून घोडेबाजार होऊ देणार नसल्याचे नेत्यांनी स्पष्ट केले. दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी अत्यंत अटीसाठीची चुरस पहावयास मिळत आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis