
छत्रपती संभाजीनगर, 16 मार्च (हिं.स.)। भाजपाच्या विरोधात राहुल गांधी तथा काँग्रेस आंदोलन करत असताना दुसरीकडे राहुल गांधींनी संसदेचा अपमान केला म्हणत छत्रपती संभाजी नगरातील क्रांती चौकात भाजपने आक्रमक होत राहुल गांधींच्या विरोधामध्ये आंदोलन केले
राहुल गांधी यांच्या विरोधात संताप व्यक्त केला.
राहुल गांधी हा अजून बच्चा आहे असं म्हणत राहुल गांधींच्या वक्तव्यावर नाराज झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधींनी बांगड्या भराव्यात अशी घोषणाबाजी केली. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील आणि शहरातील भारतीय जनता पक्षाचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis