परभणी - मौजे सिंगणापूर येथे शिबीरातून 41 लाभधारकांना लाभ वितरित; नागरिकांना दिलासा
परभणी, 16 मार्च (हिं.स.)। शासनाच्या वतीने राबविण्यात येणारे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर हे अभियान नागरिकांच्या महसूल विषयक समस्या सोडविण्यासाठी व लाभार्थ्यांना विविध विभागांचे लाभ एकाच छताखाली मिळण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे, अशी
Q


परभणी, 16 मार्च (हिं.स.)।

शासनाच्या वतीने राबविण्यात येणारे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर हे अभियान नागरिकांच्या महसूल विषयक समस्या सोडविण्यासाठी व लाभार्थ्यांना विविध विभागांचे लाभ एकाच छताखाली मिळण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिली.

परभणी तालुक्यातील मौजे सिंगणापूर या महसूल मंडळाच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण व सिंगणापूर येथील प्रशासक तथा सरपंच शारदाताई पांडुरंग खिल्लारे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. शिबिरामध्ये महसूल विभागासहीत विविध शासकीय विभागांच्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. महत्त्वाचे म्हणजे एकाच दिवसात एक हजार 41 लाभधारकांना लाभ वितरित करण्यात आले.

शासनाच्यावतीने राबविण्यात येणार्या या शिबीराच्या माध्यमातून प्रशासन गावात येऊन थेट नागरिकांच्या समस्या ऐकत आहे. विविध विभाग या अभियानात सहभागी झाले आहेत. नागरिकांना कुठलाही त्रास न होता सुलभपणे लाभ मिळून देणे हा या अभियानाचा उद्देश आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले.

शिबिरात महसूल विभागामार्फत 43 प्रलंबित फेरफार निकाली काढण्यात आले. 120 डिजिटल सातबारा, 110 आठ-अ कागदपत्रचे वाटप करण्यात आले. 7 अर्जावर एक खिडकीतून कार्यवाही करण्यात आली. निराधार योजनेचा 35 लाभार्थींना लाभ मंजूर करण्यात आला. पुरवठा विभागाचे 42 तर 147 विविध प्रमाणपत्रे वितरित करण्यात आले. तसेच रोजगार हमी विभागाचे- 12, महिला व बालविकास- 50 पंचायत समिती घरकुल लाभार्थी - 29 जिल्हा कौशल्य विभाग -26, आयुष्मान भारत कार्ड - 68 नोंदणी व मुद्रांक विभाग - 16 पशुसंवर्धन विभाग - 151 तालुका कृषी अधिकारी कार्यालय - 38, आर्थिक साक्षरता - 40, जिल्हा महिला बालविकास - 41, आधार केंद्र- 13 भुमिअभिलेख विभागाच्यावतीने 42 लाभ वितरित करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande