नाशिक: म्हाडा राखीव गृहनिर्माण प्रकरणात बिल्डर सोनू मनवानी अटकेत
नाशिक, 16 मार्च (हिं.स.) : म्हाडाच्या राखीव कोट्यातील घर न दिल्याच्या प्रकरणात प्रमुख सूत्रधार मानला गेलेल्या बिल्डर सोनू मनवानीला नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. या अटकेनंतर पोलीस कारवाई अधिक गतिमान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, ज्यामध्ये काह
नाशिक: म्हाडा राखीव गृहनिर्माण प्रकरणात बिल्डर सोनू मनवानी अटकेत


नाशिक, 16 मार्च (हिं.स.) : म्हाडाच्या राखीव कोट्यातील घर न दिल्याच्या प्रकरणात प्रमुख सूत्रधार मानला गेलेल्या बिल्डर सोनू मनवानीला नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. या अटकेनंतर पोलीस कारवाई अधिक गतिमान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, ज्यामध्ये काही प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी देखील कायद्याच्या चौकटीत येऊ शकतात.

नाशिक शहरातील 49 गृहप्रकल्पांमध्ये म्हाडाच्या सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव असलेल्या 20 टक्के क्षेत्राचा नियम पाळला न गेला आणि म्हाडाची फसवणूक केली गेल्याप्रकरणी भूमी अभिलेख कार्यालयाने सरकारवाडा पोलिस ठाण्यात 194 जणांविरोधात गुन्हा नोंदवला होता.

याबाबत लक्ष वेधण्यासाठी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या भाजपा आमदार सीमा हिरे यांनी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले होते. त्यानंतर सरकारवाडा पोलिसांनी चौकशीसाठी काही बिल्डरांना नोटिसा दिल्या; मात्र, कानाडोळा केल्यामुळे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सूचनेनुसार रविवारी रात्री 12 पथके तयार करून विविध बांधकाम व्यवसायिकांच्या घरी छापे टाकले गेले.या सर्व प्रकरणांचा तपास करत नाशिक पोलीस आयुक्तालयाने आतापर्यंत 108 प्रकरणांचा तपास पूर्ण केला असून पुढील कारवाई सुरू आहे. सोनू मनवानीवर अधिक तपास सुरू असून, त्याला लवकरच न्यायालयात हजर केले जाणार आहे.

भूमी अभिलेख विभागाची मदत घेत या प्रकरणात काही बांधकाम व्यवसायिकांवर अटक होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर काही सरकारी अधिकारी आणि कर्मचारीही कायद्याच्या चौकटीत येऊ शकतात. सरकारवाडा पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पोलीस तपासाला अजून गती देत आहेत आणि प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.

----------------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande