अमरावती : विद्यार्थ्यास मारहाण प्रकरणी शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल
अमरावती, 16 मार्च (हिं.स.)।इयत्ता सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या डोक्यावर जबर मारहाण केल्याप्रकरणी गाडगेनगर ठाण्यात एका प्रतिष्ठित इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक मुलगा शहरातील एका इंग्रजी माध्यमाच्या
अमरावती : विद्यार्थ्यास मारहाण प्रकरणी शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल


अमरावती, 16 मार्च (हिं.स.)।इयत्ता सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या डोक्यावर जबर मारहाण केल्याप्रकरणी गाडगेनगर ठाण्यात एका प्रतिष्ठित इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक मुलगा शहरातील एका इंग्रजी माध्यमाच्या विनाअनुदानित शाळेत शिकतो.

चार डिसेंबर २०२५ रोजी शाळेचा नियमित तास सुरू असताना सदर महिला शिक्षिकेने संबंधित मुलगा वर्गात हसला, एवढ्याशा क्षुल्लक कारणावरून मुलाला डोक्यावर जबर मारहाण केली. त्यामुळे भोवळ येऊन सदर विद्यार्थी हा वर्गातच तोल जाऊन बेंचवर पडता पडता वाचला, असे मुलाने घरी येऊन पालकांना सांगितले. त्यामुळे मुलाच्या पालकांनी शाळेतील सदर शिक्षिकेला फोन करून क्षुल्लक कारणासाठी डोक्यावर मारहाण का केली? अशी विचारणा शिक्षिकडे केली होती. त्यावेळी शिक्षिकेने घडलेल्या घटनेबद्दल विद्यार्थ्याच्या पालकांसोबत बोलताना चूक झाल्याचे मान्य केले. शिक्षिकेने विद्यार्थ्याच्या डोक्यावर मारहाण केल्यामुळे त्यास डोकेदुखीचा त्रास सुरू झाला, असा आरोप पालकाने गाडगेनगर ठाण्यात दाखल तक्रारीत केला आहे. त्या आधारे शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande