चंद्रपूर : ताडोबाच्या बफर मध्ये वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार
चंद्रपूर, 16 मार्च (हिं.स.)।ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफरमध्ये वाघाच्या २१ वर्षीय गुराखी ठार झाल्याची घटना सोमवारी घडली. दरम्यान}चंद्रपूर जिल्ह्यात चालू वर्षात आतापर्यंत वन्यजीवांच्या हल्ल्याशी संबंधित घटनांमध्ये ९ जणांच्या मृत्यूची नोंद
चंद्रपूर : ताडोबाच्या बफर मध्ये वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार


चंद्रपूर, 16 मार्च (हिं.स.)।ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफरमध्ये वाघाच्या २१ वर्षीय गुराखी ठार झाल्याची घटना सोमवारी घडली. दरम्यान}चंद्रपूर जिल्ह्यात चालू वर्षात आतापर्यंत वन्यजीवांच्या हल्ल्याशी संबंधित घटनांमध्ये ९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

ताडोबाच्या बफर अंतर्गत चकनिंबाळा येथील रहिवासी असलेले करण किसन शेडमाके हे दुपारी शेतात बैलांना चरायला घेऊन गेले होते. त्यावेळी परिसरातून जाणाऱ्या एका वाघाने अचानक जनावरावर हल्ला केला. शेडमाके बैलाला वाचवण्याच्या प्रयत्नात ओरडत पुढे सरकले. परंतु वाघाने त्याच्यावर हल्ला केला व ठार केले. जवळ असलेल्या शेतमजुरांनी आरडा ओरड केली, ज्यामुळे वाघ मृतदेह सोडून जंगलात पळून गेला. माहिती मिळताच घटनास्थळी वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने दाखल गुराख्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande