परीक्षा मुल्यांकन केंद्रावर अनियमितता होऊ नये, म्हणून काळजी घेतली - कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे
चंद्रपूर, 16 मार्च (हिं.स.)। गोंडवाना विद्यापीठात परीक्षेचे काम सुरूवातीपासूनच अतिशय सुरळीत सुरू आहे. विद्यापीठातील सेवारत अधिकारी, कर्मचारी आपल्या कर्तव्याप्रति प्रामाणिक राहून विद्यापीठ प्रशासनाने दिलेली जबाबदारी पार पाडत आहेत. यातच का
परीक्षा मुल्यांकन केंद्रावर अनियमितता होऊ नये, म्हणून काळजी घेतली - कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे


चंद्रपूर, 16 मार्च (हिं.स.)।

गोंडवाना विद्यापीठात परीक्षेचे काम सुरूवातीपासूनच अतिशय सुरळीत सुरू आहे. विद्यापीठातील सेवारत अधिकारी, कर्मचारी आपल्या कर्तव्याप्रति प्रामाणिक राहून विद्यापीठ प्रशासनाने दिलेली जबाबदारी पार पाडत आहेत. यातच काही परीक्षा मुल्यांकन केंद्रावर अनियमीतता सुरू असल्याची चर्चा विद्यापीठ प्रशासनाकडे आली. चर्चेनुसार भविष्यात कोणताही धोका अथवा अनियमितता होऊ नये, याकरिता विद्यापीठ प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेतली असल्याची माहिती गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

गोंडवाना विद्यापीठ आपल्या कार्यकुशलतेने वेळेत उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नेहमीच पुढे असते. याची दखल राज्य शासनाने सुद्धा घेतली आहे. विद्यापीठातील पुर्नमुल्यांकन विभाग हा अत्यंत गोपनीय स्वरूपाचा विभाग आहे. दररोज कामकाज पूर्ण झाल्यानंतर संबंधित कक्ष नियमानुसार सील करण्यात येते व पुढील दिवशी कामकाज सुरु करताना अधिकृतरीत्या सील उघडण्यात येते. ही नियमित प्रशासकीय व सुरक्षा प्रक्रिया आहे असे डॉ.बोकारे सांगितले.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना आधुनिक व बहुविषयक शिक्षण देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. विद्यार्थ्यांना संशोधन, नवोन्मेष व कौशल्याधारित शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे हे आगामी काळातील महत्त्वाचे उद्दिष्ट असणार असल्याचे डॉ.बोकारे यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेला गोंडवाना विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, परीक्षा संचालक डॉ. प्रवीण पोटदुखे प्रामुख्याने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande