
छत्रपती संभाजीनगर, 17 मार्च (हिं.स.)। स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांची ४३२ वी जयंती आणि छत्रपती स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांचा ३३७(बलिदान दिन) बुधवारी (दि.१८) एकाच दिवशी येत असल्याने वेरूळ येथे संयुक्त अभिवादन व आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा हा सोहळा अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय जयंती महोत्सव समितीने घेतला आहे.
बुधवारी सकाळी ९ वाजता शहाजीराजे भोसले यांना अभिवादन तसेच छत्रपती संभाजी महाराज यांना वाहण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मनोज जरांगे पाटील, स्वामी शांतिगिरी महाराज, आक्काताई, अभयानंद महाराज यांच्यासह अनेक संत-महंत तसेच खुलताबाद तालुक्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि छावा पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला शिवभक्तांनी उपस्थित राहावे, असे आवाहन राजेंद्र पवार व प्रकाश पाटील मिसाळ यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis