
छत्रपती संभाजीनगर, 17 मार्च (हिं.स.)।गंगापूर शहरात घरगुती गॅस सिलिंडरचा मुबलक साठा उपलब्ध असून ग्राहकांनी हैराण होण्याची गरज नाही, अशी मागणी इंडेन गॅस एजन्सीचे संचालक संदीप कराळे यांनी दिली आहे. सध्या आखाती देशातील युद्धाच्या पार्शवभूमीवर गॅसचा तुटवडा निर्माण झाला असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र शहरात घरगुती गॅसचा तुटवडा नसल्याचे दिसून येत आहे. गॅस बुकिंगची ऑनलाइन यंत्रणा बंद पडल्यामुळे मोबाईलवरून गॅस बुकिंगला अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्राहक प्रत्यक्ष गॅस एजन्सीवर जावून आपली बुकिंग करून घेताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत येथे गर्दी दिसून येत असल्यानेनागरिकांमध्ये गैरसमज निर्माण होत आहे. मात्र वितरण प्रणालीत कोणतीही अडचण नसल्याची माहिती एजन्सीधारकांकडून देण्यात आली आहे. याबाबत संबंधित एजन्सी संचालक संदीप कराळे यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले की, सोशल मीडियातील अफवेमुळे लोक पॅनिक झाले आहेत. आजघडीला ज्याला गरज नाही तेही गॅस भरून घेत आहेत, ज्यांची बुकिंग आहे त्यांना सध्यातरी वेळेवर गॅस मिळत आहे. लोकांनी गर्दी करण्याची आवश्यकता नाही. मनमाड येथील डेपोतून आपल्याला गॅस पुरवठा होतो. तथापि यापूर्वी रोज गॅसचा पुरवठा होत होता आता मात्र दिवसाआड पुरवठा होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis