
बीड, 16 मार्च (हिं.स.)।
लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याचा ३४ वा गळीत हंगाम (२०२५-२६) सांगता समारंभ व गव्हाण पूजन उत्साहात संपन्न झाले.
कारखान्याच्या योग्य नियोजनामुळे १२२ दिवसात ६ लाख ७१ हजार मेट्रिक टन ऊस गाळप यशस्वीरीत्या पूर्ण झाले, याचे समाधान आहे. ऊसतोड व वाहतूक ठेकेदारांना प्रोत्साहन म्हणून दरवर्षीप्रमाणे यंदाही बक्षिसे देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
AI तंत्रज्ञानाच्या मदतीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी अधिकाधिक उत्पादन व उत्पन्न मिळवावे, यासाठीसातत्याने प्रयत्न सुरू आहेत. मात्र अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद अद्याप मिळालेला नाही. पुढील काळात अधिकाधिक शेतकरी या उपक्रमाशी जोडले जावेत यासाठी निश्चितपणे प्रयत्न करू. असे आमदार प्रकाश सोळंके यांनी सांगितले
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis