नाविन्यपूर्ण शेती करण्यावर भर द्या – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
नांदेड, 16 मार्च (हिं.स.)। शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकाऐवजी नाविन्यपूर्ण पिकांचा अवलंब करून उत्पादकता वाढीवर भर द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. यासाठी जिल्हा प्रशासन व कृषी विभागामार्फत सातत्याने प्रयत्न करण्यात येत असल्याचे
नाविन्यपूर्ण शेती करण्यावर भर द्या – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले


नांदेड, 16 मार्च (हिं.स.)।

शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकाऐवजी नाविन्यपूर्ण पिकांचा अवलंब करून उत्पादकता वाढीवर भर द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. यासाठी जिल्हा प्रशासन व कृषी विभागामार्फत सातत्याने प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, जिल्ह्यात रेशीम शेती, चिया सिड लागवड, फार्मर कप, सेंद्रिय शेतीचे फायदे, दुग्ध व्यवसाय वृद्धीसाठी उपाययोजना, कृत्रिम रेतनाचा अवलंब, शेतीतील यांत्रिकीकरणाचा वापर तसेच बीबीएफ (BBF) पद्धतीचा वापर यांसारख्या उपक्रमांना प्रोत्साहन दिले जात आहे. यासोबतच बांबू लागवडीचे फायदे आणि पीक कापणी प्रयोग याबाबतही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगली बाजारपेठ मिळावी यासाठी नांदेड शहराला इतर मोठ्या शहरांशी जोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. या कृषी महोत्सव व प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande