अमरावती महापालिकेची मंगळवारी आमसभा
अमरावती, 16 मार्च (हिं.स.)। अमरावती महापालिकेची सर्वसाधारण सभा १७ मार्च रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी प्रशासकीय आणि राजकीय स्तरावर मोठी तयारी सुरू आहे.या आमसभेत प्रशासनाकडून चार महत्त्वाचे विषय चर्चेसाठी ठेवण्यात येणार असून
नगरसेवकांचा शंभरहून अधिक प्रस्तावांचा भडीमारः ४६ प्रश्नांवर चर्चा उद्या मनपाची आमसभा गाळे भाडेवाढ व पथदिव्यांचा प्रश्न गाजणार


अमरावती, 16 मार्च (हिं.स.)। अमरावती महापालिकेची सर्वसाधारण सभा १७ मार्च रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी प्रशासकीय आणि राजकीय स्तरावर मोठी तयारी सुरू आहे.या आमसभेत प्रशासनाकडून चार महत्त्वाचे विषय चर्चेसाठी ठेवण्यात येणार असून, त्यावर होणाऱ्या निर्णयांमुळे शहराच्या विकासाची दिशा ठरणार असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, नगरसेवकांनीही या सभेसाठी कंबर कसली असून प्रशासनाकडे १०० हून अधिक प्रस्ताव आणि ४६ पेक्षा जास्त प्रश्न सादर करण्यात आले आहेत. त्यामुळे सभेत जोरदार चर्चा आणि आरोप-प्रत्यारोपांची शक्यता वर्तविली जात आहे.सभेत महापालिकेच्या शिक्षण, शहर सुधार, विधी तसेच महिला व बालकल्याण या चार महत्त्वाच्या विषय समित्यांच्या प्रत्येकी नऊ सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. यासोबतच वृक्ष प्राधिकरण समितीची पुनर्रचना देखील या सभेत होणार आहे. याशिवाय महापालिका संकुलातील दुकानांच्या भाडेवाढीचा विषयही निर्णयासाठी सभेपुढे येणार आहे. भाडेवाढ किती प्रमाणात होणार, याकडे व्यापाऱ्यांसह शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. तसेच शहरातील पथदिवे व एलईडी देखभाल कंत्राटाचा प्रस्तावही मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. दरम्यान, शहरातील फेरीवाल्यांसाठी हॉकर्स धोरणाबाबतही यासभेत महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे.या सभेसाठी नगरसेवकांकडून मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. एकूणच १७ मार्चची ही आमसभा राजकीयदृष्ट्या गाजण्याची शक्यता व्यक्त होत असून, अनेक महत्त्वाच्या निर्णयांमुळे शहराच्या प्रशासकीय कामकाजावर त्याचा परिणाम होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande