
छत्रपती संभाजीनगर, 16 मार्च (हिं.स.)।
पैठण येथील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यातील कामगारांच्या भविष्य निर्वाह निधी (पीएफ) रकमेबाबत चौकशी करण्याची मागणी खासदार संदिपान भुमरे यांनी केंद्रीय ईपीएफ आयुक्तांकडे केली आहे.
१ जानेवारी २०२२ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत कामगारांच्या वेतनातून कपात झालेली व कारखान्याकडून जमा झालेल्या पीएफ रकमेचा तपशील देण्याची मागणी करण्यात आली आहे. पीएफ थकबाकी व संभाव्य अनियमिततेची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणावर पुढील कारवाईसाठी १८ मार्च रोजी मंत्रालयात सहकारमंत्र्यांच्या दालनात विशेष बैठक आयोजित करण्यात आली असून कामगारांना त्यांचा हक्काचा निधी मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis