लातूर जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी महायुतीकडून प्रत्येकी १ तर काँग्रेसकडून प्रत्येकी ३ अर्ज दाखल
लातूर, 16 मार्च (हिं.स.) जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांच्या निवडीची प्रक्रिया आज अप्पर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव सभागृहात पार पडणार आहे. या अर्जाची छ
जिल्हा परिषद


लातूर, 16 मार्च (हिं.स.) जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांच्या निवडीची प्रक्रिया आज अप्पर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव सभागृहात पार पडणार आहे. या अर्जाची छानणी होणार असून त्यानंतर होणाऱ्या सभेत अध्यक्ष व उपाध्यक्षाच्या निवडी होणार आहेत. महायुतीने अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी प्रत्येकी १ तर काँग्रेसने प्रत्येकी ३ अर्ज दाखल केले आहेत. भाजपकडून वलांडी गटातील उषा संभाजीराव पाटील तळेगावकर यांनी अध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून जानवळ गटातील दयानंद सूर्यवंशी यांनी उपाध्यक्ष पदासाठी अर्ज भरला. काँग्रेसने मात्र जोरदार प्रयत्न केले. अध्यक्ष पदासाठी दिपाली शामराव भोसले, राजश्री धनंजय देशमुख :१ आणि मानसी प्रमोद मरूरे यांनी तर उपाध्यक्ष पदासाठी केंद्रे नागेश्वरी सचिन, मुकेश भालेराव आणि अश्विनी दत्तात्रय शिंदे यांनी नामनिर्देशन दाखल केले. तरीही सदस्य संख्येच्या आधारावर महायुतीचाच उमेदवार निवड होण्याची शक्यता दिसत आहे.गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या तुलनेत भाजपला अर्ध्या जागा मिळाल्या असल्या तरी, राष्ट्रवादी अजित पवार गटाची साथ घेऊन त्यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande