पुणे - अफवांमुळे पुण्यात गॅस बुकिंगचा भडका
पुणे, 16 मार्च (हिं.स.)। अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅसटंचाई निर्माण होईल, या भीतीने नागरिक मोठ्या प्रमाणावर गॅस बुकिंग करीत असून, गॅस एजन्सीबाहेर गर्दी करीत आहेत. मात्र, प्रत्यक्षात गॅसपुरवठा मुबलक असून, फक्त भीतीने बुकिंगमुळे व
gas


पुणे, 16 मार्च (हिं.स.)। अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅसटंचाई निर्माण होईल, या भीतीने नागरिक मोठ्या प्रमाणावर गॅस बुकिंग करीत असून, गॅस एजन्सीबाहेर गर्दी करीत आहेत. मात्र, प्रत्यक्षात गॅसपुरवठा मुबलक असून, फक्त भीतीने बुकिंगमुळे वितरणव्यवस्थेवर ताण येत असल्याचे शहरातील काही गॅसवितरकांनी सांगितले.समाजमाध्यमांवर फिरणारे व्हिडीओ, रील्स आणि त्यामुळे उठणाऱ्या अफवांमुळे गॅस बुकिंगच्या प्रमाणात दुपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे बहुतांश नागरिक गॅस घरात उपलब्ध असतानाही फक्त घरात साठा करण्यासाठी गॅस बुकिंग करतात. त्याअनुषंगाने प्रत्यक्षात काय स्थिती आहे, खरेच गॅसचा तुटवडा आहे की नाही, याची दै. ‘पुढारी’कडून प्रत्यक्ष पाहणी करून गॅसवितरकांशी संवाद साधण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande