नांदेड जिल्ह्यातील १६ तालुक्यांत गॅससाठी वणवण
नांदेड, 16 मार्च (हिं.स.) - इराण अमेरीका युध्दामुळे गॅसच्या दरात वाढ झाली हे खरे असले तरी, महाग होऊनही गॅस सिलिंडर मिळत नसल्याची बोंब सध्या सर्वत्र होताना दिसत आहे. एकीकडे डिजिटल इंडियाच्या गप्पा मारल्या जात असताना, नांदेड जिल्ह्यात मात्र गेल्या का
नांदेड जिल्ह्यातील १६ तालुक्यांत गॅससाठी वणवण


नांदेड, 16 मार्च (हिं.स.) - इराण अमेरीका युध्दामुळे गॅसच्या दरात वाढ झाली हे खरे असले तरी, महाग होऊनही गॅस सिलिंडर मिळत नसल्याची बोंब सध्या सर्वत्र होताना दिसत आहे. एकीकडे डिजिटल इंडियाच्या गप्पा मारल्या जात असताना, नांदेड जिल्ह्यात मात्र गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलिंडरच्या ऑनलाईन बुकिंग यंत्रणेला सव्र्व्हर डाऊनचे ग्रहण लागले आहे. जिल्ह्यातील १६ तालुक्यांत गॅससाठी वणवण करावी लागत असून, अधिकृत यंत्रणा कोलमडल्याने कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, सर्वसामान्य ग्राहकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत असताना, हॉटेल व्यावसायिक आणि घरगुती वापराच्या सिलिंडरचा हटिल आणि इतर व्यावसायिक ठिकाणी वापर करणे बेकायदेशीर आहे. पण नांदेडमध्ये सर्रासपणे घरगुती सिलिंडर जादा दराने विकले जात आहेत. काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासनाने नेमलेली भरारी पथके नेमकी कुठे आहेत? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. हॉटेल व्यावसायिकांना सिलिंडर मिळतो, मग सामान्य गृहिणींना का नाही? असा संशय आता बळावू लागला आहे.

जिल्ह्यात घरगुती गॅस ग्राहकांची संख्या मोठी आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून गॅस कंपन्यांचे सर्व्हर तात्रिक बिघाडामुळे बंद असल्याचे कारण वितरकांकडून दिले जात आहे. ऑनलाईन बुकिंग होत नसल्याने गॅस एजन्सीवर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. त्यातच वितरकांचे मोबाईल फोन लागत नाहीत आणि प्रत्यक्ष गेल्यावर ग्राहकांना समाधानकारक उत्तरे मिळत नसल्यान संतापाची लाट उसळली आहे.

जिल्हा पुरवठा अधिकारी, गॅस कंपन्यांचे प्रतिनिधी आणि स्थानिक राजकीय नेते जिल्ह्यात गॅसचा पुरेसा साठा आहे, टंचाई नाही असे दावे करत आहेत. जर पुरवठा सुरळीत आहे, तर मग प्रत्येक गॅस एजन्सी समोर पहाटेपासून रांगा का लागतात? हा प्रश्न सर्वसामान्यांना छळत आहे. अधिकाऱ्यांचे दावे आणि जमिनीवरील वास्तव यात मोठी तफावत दिसून येत आहे.

नांदेड जिल्हयात गॅस सिलिंडर साठी सोळा तालुक्यातही एकसारखी परिस्थिती आहे. इंडियन ऑईल, हिंदुस्तान पेट्रोलियम व इंडेन गॅस या तीन एजेन्सींचे जवळपास साडेसात लाख ग्राहक आहेत. घरगुती गॅस धारकांना वर्षातून १२ सिलिंडर मिळतात. त्यात काहींकडे दोन ते तीन सिलिंडर आहे.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande