
छत्रपती संभाजीनगर, 16 मार्च (हिं.स.)।छत्रपती संभाजी नगर शहर आणि जिल्ह्यातील गॅस तुटवड्यामुळे मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत
गॅस नसल्याने शुभकार्यांतील केटरिंग व्यवसाय अडचणीत आले आहेत.
गॅस सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने लग्नसमारंभ व इतर शुभकार्यांमध्ये केटरिंग व्यवसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मोठ्या प्रमाणावर स्वयंपाकासाठी आवश्यक असलेला गॅस उपलब्ध नसल्याने अनेक केटरर्सना कार्यक्रम पार पाडताना अडथळे येत आहेत. काही ठिकाणी मेन्यू कमी करावा लागत आहे तर काहींना पर्यायी इंधनाचा वापर करावा लागत आहे. गॅस टंचाई कायम राहिल्यास लग्नसराईच्या हंगामात केटरिंग व्यवसायाला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेक व्यावसायिक तारखा बदलण्याच्या सूचना देत आहेत
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis