सर्वाधिक गाळप; येडेश्वरी कारखान्याचा गळीत हंगाम यशस्वीरीत्या संपन्न
बीड, 16 मार्च (हिं.स.)। केज तालुक्यातील आनंदगाव येथील येडेश्वरी साखर कारखाना लि. (युनिट क्र.१) चा सन २०२५-२६ चा गळीत हंगाम मिल पूजन करून संपन्न झाला. ऊस उत्पादक शेतकरी, कारखान्याचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे यंदाच
सर्वाधिक गाळप; येडेश्वरी कारखान्याचा गळीत हंगाम यशस्वीरीत्या संपन्न


बीड, 16 मार्च (हिं.स.)।

केज तालुक्यातील आनंदगाव येथील येडेश्वरी साखर कारखाना लि. (युनिट क्र.१) चा सन २०२५-२६ चा गळीत हंगाम मिल पूजन करून संपन्न झाला. ऊस उत्पादक शेतकरी, कारखान्याचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे यंदाचा गळीत हंगाम पूर्णत्वास गेला. बीड जिल्ह्यात सर्वाधिक उसाचे गाळप येडेश्वरी कारखान्याने केले आहे.

कारखान्याकडून यंदाच्या हंगामात एकूण ९,२२,११६.३७९ मेट्रिक टन ऊस गाळप करण्यात आले असून,

हंगामात ऊस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी शेतकरी आणि कारखाना प्रशासन यांच्यात समन्वय राखण्यात आला. तसेच कामगारांचे नियोजन, वाहतूक व्यवस्था आणि तांत्रिक व्यवस्थापन यामुळे गळीत प्रक्रिया पार पडली. गळीत हंगामाच्या सांगता समारंभानिमित्त मिल पूजन करण्यात आले. खा. बजरंग

सोनवणे म्हणाले, 'येडेश्वरी साखर कारखान्याचा २०२५-२६ चा गळीत हंगाम यशस्वीरीत्या पूर्ण होणे ही आनंदाची बाब आहे. ऊस उत्पादक शेतकरी, कारखान्याचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व कामगार यांच्या संयुक्त परिश्रमांमुळे ही कामगिरी शक्य झाली आहे. पुढील गळीत हंगाम अधिक यशस्वी व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करतो, असेही ते म्हणाले.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande