
बीड, 16 मार्च (हिं.स.)।
बीड शहरातील राजूर वेस भागात 'मीना बाजार' आणि छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथे 'ईद बाजार'चा शुभारंभ करण्यात आला.
हे बाजार म्हणजे केवळ खरेदी-विक्रीचे केंद्र नसून, आपल्या बीडच्या सर्वधर्मसमभावाचे आणि सामाजिक एकतेचे एक सुंदर प्रतीक आहेत. या ठिकाणी हिंदू, मुस्लिम आणि सर्वच जाती-धर्माचे बांधव एकत्र येऊन अगदी आनंदाने खरेदीचा आनंद लुटतात.
या बाजारात दिल्ली, उत्तर प्रदेश अशा विविध राज्यांतून अनेक व्यापारी बांधव आपले स्टॉल्स लावण्यासाठी आले आहेत. घरात लागणाऱ्या दैनंदिन उपयोगाच्या वस्तूंपासून ते आकर्षक गालीच्यांपर्यंत (Carpets) अनेकविध वस्तू या ठिकाणी उपलब्ध आहेत. यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होते व रोजगारालाही चालना मिळते. या 'मीना बाजार' आणि 'ईद बाजार'साठी बीड नगरपरिषदेच्या माध्यमातून जागा आणि आवश्यक त्या सर्व दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी, सर्वश्री मुजीब भाई शेख (नगराध्यक्ष प्रतिनिधी), विनोद मुळूक (उपाध्यक्ष, न.प. बीड), निजाम शेख (बांधकाम सभापती), बाळासाहेब गुंजाळ (नियोजन सभापती), जैतुला खान (ज्येष्ठ नगरसेवक) यांच्यासह हिंदू-मुस्लिम बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis